Shegaon Quotes - Gajanan Maharaj Quotes
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ऽ ऽ...
पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला । बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।
न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती । कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।
सदासर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेची आता ।।१।।
उपासनेला दृढ चालवावे । भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे । सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।
ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे । त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।
मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम । तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर ।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर । यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।
आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम् । पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर ।।
श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।
जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड-मुढ ताराया ।
।। जयदेव जयदेव ।।धृ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरलें जे या जगताशी ।
तें तूं तत्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रे धरिलें मानवदेहासी ।
।। जयदेव जयदेव ।।१।।
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।
करूनी गणि गण गणांत बोते या भजना ।
धाता हरिहर गुरूवर तूंचि सुखसदना ।
जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ।
।। जयदेव जयदेव ।।२।।
लीला अनंत केल्या बंकट सदनास ।
पेटविले त्या अग्नीवांचूनी चिलमेस ।
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।
।। जयदेव जयदेव ।।३।।
व्याधी वारून केलें कैका संपन्न ।
करविले भक्तालागी विठ्ठल-दर्शन ।
भवqसधु हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूंचे मान्य करा कवन ।
।।जयदेव जयदेव ।।४।।
Shri Pandurang aarti
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।। पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणी वाहे भीमा उध्दरी जगा ।।१।। जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जयदेव जयदेव ।।धृ।। तुळसी माळा गळां कर ठेवूनी कटीं । कासे पितांबर कस्तूरी लल्लाटी । देवसुरवर नित्य येती भेटी ।। गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जयदेव जयदेव ।।२।। आषाढी कार्तिकी भक्त जन येती । साधु जन येती। चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ति । केशवासी नामदेव माधवासी नामदेव, भावें ओंवाळितीं ।। जयदेव जय पांडुरंगा ।।३।।-कापुरार्ती -
जयजय कर्पूरगौरा । तारी जयजय कर्पूरगौरा ।। धृ।। भस्म हे चर्चित निल गलांबर झल्लालती रूंडमाळा।। इंदु लल्लाटी शोभतसे कटी । गजचर्म व्याघ्रांबरा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।।१।। श्वेतासनी महाराज विराजित । अंकी बसे सुंदरा । भक्त दयाघन वंदिती चरण । धन्य तु लीलावतारा । शंभो जयजय कर्पूरगौरा ।।२।। मतिमंद दीन झालो पदी लीन । पार करी संसारा । काशीसूतात्मज मागतसे तुज । द्या चरणी मज थारा ।। शंभो जयजय कर्पूरगौरा ।।३।। तारी जय जयकर्पूरगौंरा कर्पूरगौरं करूणावतारं । संसारसारं भुजगेंद्रहारं । सदा वसंतं हृदयारqवदे ।भवं भवान्यासाहित नमामि ।। मंदारमाला कपाल काय । दिगंबराय दिगंबराय ।। नमः शिवाय नमः शिवाय ।। कर्पूर महादीप समर्पयामी
-मंत्रपुष्पांजली-
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः।।ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो दतातु । कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।। ॐ स्वस्ति । सामराज्यं, भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्य, पारमेष्ट्यं राज्यंमहा राज्यमहा धिपत्यमयं समंत पर्याईस्यात् सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात पृथिव्यै समुद्रपर्याताया एकराळिति । तदप्येष श्लोको ऽ भिगीतो मरूतः परिवेष्टारो मरूतस्या ऽ वसन् गृहे ।। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।। तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।। ॐ पूर्ण ब्रम्हाय धिमही, तन्नो सद्गुरू प्रचोदयात ।।
Gajanan Maharaj Quotes |
Gajanan Maharaj Quotes in Marathi |
Images of Gajanan Maharaj |
Gajanan Maharaj Images |
Gajanan Maharaj Images |
Shegaon Gajanan Maharaj Images |
Gajanan Maharaj Images free download |
shegaon Gajanan Maharaj photo |
Gajanan Maharaj Quotes in marathi |
Gajanan Maharaj Quotes in marathi |
No comments:
Post a Comment